जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेड (RITES)मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांकडे ही मोठी संधी असणार आहे.

RITES ने अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केलीय. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी २५ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
राइट्समध्ये ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी ११२ रिक्त जागा आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी २९ रिक्त जागा आहे.ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ४६ जागा रिक्त आहेत.
राइट्समध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने (B.E/B.Tech/B.Atch)इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. डिप्लोमा अप्रेंचिस पदासाठी इंजिनियरिंग केलेले असावे. तसेच ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी.
इतका पगार मिळेल..
या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १४००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १०,००० रुपये पगार मिळणार आहे