⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मोठी बातमी ! जिल्ह्यातील १५ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. अ,ब आणि क अशा तिन टप्प्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.


जिल्ह्यातील १५ नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ अखेर संपुष्टात आली आहे. या नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त आहेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका स्थगित ठेवण्याबाबत राज्य शासनाने कायदादेखील केला मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करुन निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.


राज्य निवडणुक आयोगाने अ,ब आणि क अशा तिन टप्प्यात नगरपरिषदंाचे वर्गीकरण करुन, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात भुसावळ नगरपालिका अ वर्गात असून, ब वर्गातील अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा आणि क वर्गातील भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, सावदा, यावल, रावेर, नशिराबाद या नगरपरिषदांसाठी प्रभाग रचनेवर दि. १० ते १४ मे या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या आहेत. दि. २३ मे रोजी हरकतींवर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे. दि. ३० मे रोजी हरकती व सुचनांचा अहवाल राज्य निवडणुक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. दि. ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली जाणार आहे.