अमळनेरच्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याला सायबर ठगांनी लावला लाखोंचा चुना, अशी झाली फसवणूक?

सप्टेंबर 19, 2025 8:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले असून नागरिकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गंडविले जात आहे. असाच एक प्रकार आता अमळनेरातून समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीतून बंपर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ७९ वर्षीय सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याची ५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

अमळनेर येथील रहिवासी असलेले प्रकाश जानकीराम बडगुजर (वय ७९) हे सेवानिवृत्त एसटी कर्मचारी आहेत. दि. १ मे ते दि. ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्यांना रिधी वर्मा आणि आकाश सिंग या दोन अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. त्यांनी क्वांटा पल्स नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष बडगुजर यांना दाखवले.

Advertisements

बडगुजर यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतविले. त्यानंतर त्यांना ‘क्वांटा पल्स अॅपमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर १८ लाख ८५ हजार ३१६ रुपये नफा झाल्याचे व्हर्चुअली दाखविण्यात आले. हा दाखविण्यात आलेला नफा पाहून बडगुजर यांचा विश्वास आणखी वाढला. या विश्वासामुळे त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ५ लाख ६० हजार ६८३ रुपये ऑनलाइन जमा केले. नंतर गुंतवणुकीचा परतावा मिळाला नाही तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गुन्हा दाखल केला.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now