⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

पोलीस पाटील आणि कोतवाल भरती परिक्षेचा निकाल जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। जिल्हा प्रशासनातर्फे आज घेण्यात आलेल्या पोलीस पाटील आणि कोतवाल भरती परिक्षेचा निकाल विक्रमी वेळेत जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने पोलीस पाटील आणि कोतवाल यांची जंबो भरती जाहीर केली होती. या अनुषंगाने आज पोलीस पाटील आणि सोबत कोतवाल भरतीची परिक्षा आज जळगाव येथे घेण्यात आली. सकाळी ११ आणि दुपारी ३ अशा दोन टप्प्यांमध्ये पोलीस पाटील आणि कोतवाल भरती परिक्षा घेण्यात आली.

दरम्यान, परिक्षा संपल्यानंतर अवघ्या सहा तासांमध्ये अर्थात रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर पोलीस पाटील आणि कोतवाल भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने देखील पोलीस पाटील आणि कोतवाल भरतीचा निकाल जाहीर केलेला आहे. हाच निकाल आम्ही आपल्याला सादर करत आहोत. आपल्याला पोलीस पाटील आणि कोतवाल भरतीाचा निकाल हा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल.

पोलीस पाटील परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

कोतवाल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच या परिक्षांसाठी परिक्षा दिलेले उमेदवार आपला निकाल जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात येथे क्लिक करून पाहू शकतात. पोलीस पाटील आणि कोतवाल भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि विक्रमी वेळेत पार पाडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी जबाबदारी अचूकपणे पार पाडल्याचे मानले जात आहे.