---Advertisement---
कोरोना महाराष्ट्र

गुड न्यूज : हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्ससह दुकानांना रात्री १० पर्यंत परवानगी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्सलाही सह सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडी राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.

WhatsApp Image 2021 08 11 at 20.51.44

कोरोना निर्बंधांबाबत कोणते महत्वाचे निर्णय
-15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुभा. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस होणं गरजेचं आहे. याचा पुरावा दाखवल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास 500 रुपये दंडासह उचित कारवाई केली जाणार आहे.
-हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेनं रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
-विवाह सोहळ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेनं परवानगी देण्यात आली आहे.
-सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
-खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.
– सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-सिनेमागृह , नाट्यगृह , धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
-इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

---Advertisement---

शाळा, महाविद्यालयांबाबत निर्णय अद्याप नाही
शाळेच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण विभाग आणि टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत. त्यानंतच अंतिम निर्णय घेतला जाईल. तसंच कुलगुरूंकडून अहवाल आल्यानंतर महाविद्यालयाच्या बाबत निर्णय होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---