⁠ 
गुरूवार, जानेवारी 2, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पोलिसांतर्फे मुख्य चौकांमध्ये चोख बंदोबस्थ

जळगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पोलिसांतर्फे मुख्य चौकांमध्ये चोख बंदोबस्थ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२४ । बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि.१६ ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून या बंदला लहान-मोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा देऊन आपला प्रतिसाद दिल्याने बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.

दरम्यान, आज हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज,आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ , माजी खासदार डॉ. उल्हास पाटील , डॉ. केतकी ताई पाटील, दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, कुलभूषण पाटील, रिपाइं महानगराध्यक्ष अनिल अडकमोल , यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बंद पाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते. परंतु जळगाव शहरातील शिवाजी पुतळा चौक परिसरात असणाऱ्या राम होंडा हे दुचाकी शोरूम सुरू असल्याचे दिसून आल्याने सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने यात शोरूमच्या काचा फुटून तसेच समोरच्या जाहिरातीच्या फलकची तोडफोड करण्यात आली.

या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन संतप्त जमावावर नियंत्रण मिळवून सकल हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करून त्यानंतर मोर्चा पुढे मार्गस्थ झाला.दरम्यान जळगाव शहरातील विविध ठिकाणी असणारे व्यापारी संकुले बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन बंदला आपला प्रतिसाद दिला. तसेच अनेक ठिकाणी हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन घोषणाबाजी करून दुकाने बंद करण्याचे आवाहन करतांना दिसून येत होते .

दरम्यान, ठिकठिकाणी बंदचे पडसाद उमटून आले. यावेळी पोलिसांतर्फे मुख्य चौकांमध्ये चोख बंदोबस्थ ठेवण्यात येऊन फिरत्या गस्त पथकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात येत होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.