⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मोठी बातमी! जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकाचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण?

मोठी बातमी! जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकाचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । जळगाव महापालिकेतून (Jalgaon Mahanagarpalika) एक मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे (BJP) नगरसेवक भगतराम रावलमल बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजीनाम्याचे पत्र त्यांनी आज मंगळवारी महापालिका आयुक्तांना सादर केले

राजीनाम्याचे नेमकं कारण काय?
माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी बालाणी यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून प्रमाणपत्र रद्दबातल ठरवले आहे. त्यामुळे बालाणींवर काय कारवाई करता येईल यासंदर्भात आयुक्तांनी विधी विभागाचा अभिप्राय मागवला होता.

मनपाने शासन व निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवून कलम ५ ब नुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी असे नमूद केले होते. मात्र यासंदर्भात दोन्ही यंत्रणांकडून कुठलाच निर्णय झालेला नाही.

राज्य शासन व निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वी भगतराम रावलमल बालाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.