जळगाव जिल्हाजळगाव शहर
डीपीतील फ्युज काढत विजेच्या खांब्यावरील तार लांबविल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । तालुक्यातील पाथरी शिवारात महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक खांब्यावरील ३५ हजार रुपये किमतीच्या ऍल्युमिनिअमचे तार तोडून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारातील गट नंबर १६५ जवळ असलेल्या शेतातील खांब्यावरील तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे पाथरी येथील शेतकरी सुका नेटके यांना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिसून आले. चोरट्यांनी चक्क डीपीतील फ्युज काढत डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेटके यांनी तत्काळ महावितरण कंपनीच्या टेक्निशियनला माहिती दिली हाेती.