जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । येथील यश लॉन्सजवळील गौरी प्राईड अपार्टमेंटच्या पार्कींगमधून दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसु लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील यश लॉन्सजवळील गौरी प्राईड अपार्टमेंट येथील रहिवासी अशोक दशरथ वानखेडे यांच्याकडे (एमएच १९ डीजी ५१४८) क्रमांकाची दुचाकी आहे. २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी आले. त्यांनी मोटारसायकल अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये लावून घरी गेले. दुसर्या दिवशी सकाळी ते कामावर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना पार्कींगमध्ये दुचाकी आढळून आली नाही. या बाबत त्यांनी सोमवारी शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.