⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

रेमाल चक्रीवादळाचे रुपांतर भयंकर वादळात होणार ; या भागाला IMD कडून सावधतेचा इशारा, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 26 मे 2024 | एकीकडे मान्सून पावसाची उत्सुकता लागली असता यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमाल’ चक्रीवादळ बांगलादेशमधील खेपुपारापासून 300 किमी अंतरावर आहे. तसेच दक्षिण पूर्वेस आणि पश्चिम बंगालच्या उत्तर उपसागरावर कॅनिंगपासून 320 किमी दक्षिण पूर्वेस आहे. येत्या सहा तासांत या चक्रीवादळाचे रुपांतर भयंकर वादळात होणार आहे.चक्रीवादळामुळे 26-27 मे रोजी 80 ते 100 किमी प्रतीतासाने वेगाने वारे वाहणार असून अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.

या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल तसेच त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहू शकतात. महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाही. तसेच केरळ आणि कर्नाटकमधील किनारी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे या भागात अतिवेगवान वारेही वाहणार असल्यामुळे आज रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.