जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस असून तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinders) किमतीत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टच्या सकाळी व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी कमी केली आहे. यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 1680 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी यासाठी 1780 रुपये मोजावे लागत होते. नवे दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, तेल कंपन्यांनी 27 दिवसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. याआधी 4 जुलै रोजी कंपन्यांकडून सिलेंडरमागे 7 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मेमध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. मात्र त्यानंतर जुलैमध्ये 7 रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीत सिलिंडर 1780 रुपयांचा झाला.
1 ऑगस्टनुसार मेट्रो शहरातील गॅस सिलिंडरचे दर
दिल्ली —- रु 1680
कोलकाता —- रु. 1802.50
मुंबई —- रु. 1640.50
चेन्नई —- रु. 1852.50