जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्डाने सर्व झोनला सुरक्षा श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे बोर्डाने पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्यास सांगितले आहे. हा अंतरिम आदेश सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना जारी करण्यात आला आहे. त्यात असे नमूद केले आहे की रेल्वेने निवड/नॉन-सिलेक्ट/ट्रेड टेस्ट/LDCE (विभागीय स्पर्धा परीक्षा)/GDCE (सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा) सारख्या पदोन्नतीच्या सर्व पद्धती वापरून रिक्त जागा भरल्या पाहिजेत.
रेल्वे बोर्डाने आपल्या आदेशात म्हटले आहे की सर्व झोनने रिक्त पदांचा तपशील तयार करावा आणि त्यांच्या भरतीसाठी योजना तयार करावी. यासाठी झोन विशेष मोहीम राबवू शकतात.
रेल्वेत अनेक पदे रिक्त आहेत
डिसेंबर 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागातील 14815 आणि वाहतूक परिवहन विभागातील 62,264 रिक्त पदांचा समावेश आहे. अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये 84,654 पदे रिक्त आहेत. यानंतर मेकॅनिकल विभागात 64,346 आणि इलेक्ट्रिकल विभागात 38,096 जागा रिक्त आहेत.
दक्षिण पूर्व रेल्वेत सुमारे 18000 पदे रिक्त आहेत
दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये सुमारे १८ हजार पदे रिक्त असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले होते. यामध्ये 17,811 पदे अराजपत्रित तर 150 पदे राजपत्रित आहेत. ओडिशातील बालासोरचे बहनगा बाजार स्टेशन दक्षिण-पूर्णा रेल्वेच्या अंतर्गत येते. जिथे भीषण रेल्वे अपघात झाला.