⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकृत‌ पध्दतीने मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरूवात १८ जुलै पासून होत आहे.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील पोलीस पाटील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. जळगाव – ४२, एरंडोल -‌६६, पाचोरा – ३६, चाळीसगाव – ४१, अमळनेर – ८०, फैजपूर – ४३ भुसावळ – ३६ असे रिक्त पदे आहेत.

भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अशंत बदल करणे पदांच्या एकूण व गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबधित उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील व तसा निर्णय अंतिम असेल असे. आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे‌.