---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

Eknath Shinde Update : ..नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता ; नारायण राणेंचे ट्विट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधानपरिषद निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एक खळबळ उडवून टाकणारी घटना समोर आलीय. ती म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे आपल्या १३ हुन जास्त समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. आता यावरून केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी एकनाथ शिंदे ट्विट करत नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर हसत हसत प्रतिक्रिया दिली आहे.

narayan rane jpg webp

काल सायंकाळपासूनच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचा मुद्दा उपस्थित करत नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कालपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे समजले. ते कुठं आहेत असं सांगायचं नसतं. आता राज्यात राहील काय आहे. तसेच ”शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता’.असेही ते म्हणाले आहे.

---Advertisement---

“आज योग दिन आहे. ७५ ठिकाणी साजरा झाला आहे. जनतेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा योगा दिन साजरा केला जातोय. त्याने प्रतिकार शक्ती वाढते. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं राहिलंय काय? काँग्रेस संकुचित होत चाललीय. केवळ बोलतात, त्यांचं अस्तित्व राहील नाही. देशात त्यांचे नेते, कार्यकर्ते काम करत नाहीत. त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश राहिला नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला,” असं राणे म्हणाले. तसेच तर

कोण कोण आमदार गुजरातमध्ये?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. तर काही वेळापूर्वीच बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. संजय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच व्हाट्सअ‍ॅपच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे. तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आणि अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---