जळगाव लाईव्ह न्यूज । डिसेंबर महिना संपत आला आहे आणि २०२६ चा पहिला महिना जानेवारी सुरू होईल. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात, आरबीआयने बँकांना अनेक सुट्ट्या दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२६ मधील अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जानेवारी २०२६ मध्ये बँका जवळपास १६ दिवस बंद असणार आहेत. यामध्ये सार्वजनिक सुट्टीसोबत वीकेंडचाही समावेश आहे. त्यामुळे जर तुमचे जानेवारी महिन्यात बँकेत काही काम असेल तर सुट्टीची यादी बघून जा. अन्यथा तुम्हाला अडचणी येतील.

रिझर्व्ह बँकेने तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये काही राज्यांमध्ये सणांनिमित्त विशेष सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातील बँकांची सुट्ट्याची यादी पाहून जा.

जानेवारीतील सुट्ट्यांची यादी

१ जानेवारी- गुरुवार नववर्षानिमित्त आणि गान नगाईनिमित्त आयजोल, चेन्नई, गंगटोक, इंफाल, ईटानगर, कोहिमा, कोलकत्ता, शिलाँग या ठिकाणी बँका बंद असणार आहेत.
२ जानेवारी २०२६ ला मन्नम जयंतीमुळे आयजोल, कोची, तिरुवनंतपुरममधील बँका बंद असणार आहेत.
३ जानेवारीला हजरत अली जयंतीमुळे लखनऊमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.
४ जानेवारी रविवारी बँका बंद असणार आहे.
१० आणि ११ जानेवारीला दुसरा शनिवार आणि रविवारनिमित्त सर्व बँका बंद असणार आहेत.
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कोलकत्त्यात बँकांना सुट्टी असणार आहे.
१४ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी, ईटानगर येथे बँका बंद असणार आहे.
१५ जानेवारी २०२६ गुरुवारी पोंगलनिमित्त बंगळुरु, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, विजयवाडामध्ये बँका बंद असणार आबे.
१६ जानेवारीला थिरुवल्लुवर दिवसनिमित्त चेन्नईत सुट्टी असणार आहे.
१७ जानेवारीला उझावर तिरुनलमुळे चेन्नईत बँका बंद असणार आहे.
१८ जानेवारीला रविवारी सर्व बँका बंद असणार आहेत.
२३ जानेवारी २०२६ रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती आणि वसंत पंचमीनिमित्त आगरतळा, भुवनेश्वर, कोलकत्ता येथे बँकांना सुट्टी असणार आहे.
२४ आणि २५ जानेवारी रोजी चौथा शनिवार आणि रविवारनिमित्त बँका बंद असणार आहेत.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानित्त सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.









