जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाहतूक सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस आरिफ भाई शेख यांनी मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर आणि जळगांव जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्या शिफारसी नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेना या विभागाच्या (रिक्षा युनिट) जिल्हा वाहतुक संघटक (जळगांव जिल्हाध्यक्ष) या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांचा विश्वास जपणे ही माझी अत्यंत महत्वाची प्राथमिक जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने मा. राज ठाकरे यांना अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारली पाहिजे असा मानस बाळगून मी कार्य करणार असे मत या वेळी रज्जाक सय्यद यांनी व्यक्त केले.