⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

रेमंडचा अभिनव उपक्रम : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ३१२ दात्यांनी केले रक्तदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त रेमंड कंपनीमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शिबिरात दिवसभरात ३१२ दात्यांनी रक्तदान केले. उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले.

इंडियन रेडक्रॉस तसेच रेमड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ रोजी रेमंड कंपनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व कामगार बांधव तसेच अधिकारी वर्ग व युनियन पदाधिकारी या सर्वांनी आपले योगदान दिले. दिवसभरात दात्यांनी ३१२ चा विक्रमी आकडा पार केला. रक्तदान शिबिराप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी उपस्थिती देत दात्यांना रक्तदानाचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कामगार संघटना, युनियन पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. रेमंड प्लांट इंचार्ज अलीम शमस्ती यांनी रेमंड व्यवस्थापनातर्फे सर्वांचे आभार मानले.