जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. अनेक नेते मंडळींनी शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनवणी केली आहे. यातच जळगावतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं असून शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू असे स्पष्ट मत जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार यांच्या निर्णयाचे मोठे दुःख आहे. देशात आणि राज्यात मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्ते यांच्यावतीने शरद पवार यांना आवाहन करण्यात आला आहे
दरम्यान, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच कार्यकर्ते भावुक झाले. तुम्ही अध्यक्षपद सोडू नका, अशी विनंती कार्यकर्ते करत होते. भारताचा बुलंद आवाज… शरद पवार, शरद पवार… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.