---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या राजकारण

रावेरमध्ये रक्षा खडसेंची विजयी ‘हॅट्रिक’ ; श्रीराम पाटीलांचा पराभव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । रावेर लोकसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला. त्यामुळे रावेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

raver loksabha raksha khadse jpg webp

रावेर लोकसभा मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना यावेळी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत चर्चा होती. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.परंतु रक्षा खडसे यांचा मतदार संघात दांडगा संपर्क तसेच त्यांनी केलेली कामे या बळावर पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.

---Advertisement---

यानंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे एकदम वातावरण बदलले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची सहानुभूती त्यांच्या मागे होती. रक्षा खडसे यांनी भाजपची ईमानदारपणे दिलेली साथ यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील उभे होते. या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

रावेरमधून कोण बाजी मारहाण याकडे लक्ष लागले होते. अखेर रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. 19व्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण ५ लाख २४ हजार ४८० मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना ३ लाख १२ हजार ४१८ मते मिळाली. त्यानुसार रक्षा खडसेंनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे.

दरम्यान रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय पहिले असता सर्वाधिक मतदान हे मलकापूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. भुसावळ मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटीदार समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना झाला असल्याने रक्षा खडसे चांगल्या मताधिक्क्यांनी विजय मिळविला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---