जळगाव लाईव्ह न्यूज । भारतात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर ठग सतत नवनवीन ट्रिक शोधून लोकांना लक्ष्य करत आहे. आता अशातच रेशनकार्डधारकही सायबर ठगांच्या निशाण्यावर आहेत.
खरंतर शिधापत्रिकेच्या मदतीने गरजू लोकांना कमी किमतीत रेशन दिले जाते. शिधापत्रिकेच्या वापरामुळे लोकांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो. सरकारने अलीकडेच शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ज्यांचे केवायसी अद्याप झालेले नाही, त्यांची शिधापत्रिका सरकार रद्द करणार आहे. शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत फसवणूकही सुरू झाली आहे, ई-केवायसीच्या नावाखाली लोकांशी फसवणूक होत आहे. ही फसवणूक कशी टाळता येईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
अशा प्रकारे करताय फसवणूक?
अन्न पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकांना केवायसी करून घेण्यास सांगितले आहे. शिधापत्रिकाधारक जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करू शकतात. आता तर सायबर ठग संधीचा फायदा घेत आहेत. रेशनकार्ड केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणारे लोकांना खोटे कॉल करत आहेत. फसवणूक करणारे लोकांना तात्काळ ई-केवायसी करण्याचे आमिष दाखवत आहेत. ई-केवायसीच्या नावाने फसवणूक करणारे फेक मेसेज पाठवत आहेत, त्या लिंकवर क्लिक करताच फोन हॅक होतो. ते तुमची सर्व माहिती चोरतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुमच्या रेशनकार्डचे ई-केवायसी झाले नसेल आणि तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन येत असेल तर तो फसवणूक करणारा असण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा की ई-केवायसीसाठी प्रशासनाकडून कोणताही कॉल केला जात नाही. असा फोन आल्यावर ते काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही असे केल्यास तुमचे खाते रिकामे केले जाईल.