जळगाव शहर

हिंदी गीतांपासून मराठी गीतापर्यंतचा सुरेल प्रवासाने रसिक मंत्रमुग्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । ये मेरे वतन के लोगो…ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…लग जा गले…असे भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांचे हिंदी, मराठी चित्रपटातील एकसे बढकर एक सदाबहार गीते सादर करून रसिक मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते रायसोनी इस्टीट्यूटच्या वतीने आयोजित “लता फाॅरेवर” या कार्यक्रमाचे.

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात शुक्रवार ता. १५ रोजी सायंकाळी ६ वाजता सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर गीते सादर करणाऱ्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या गीतांची चित्रपटसृष्टीत सातत्याने भर पडत असली तरी ‘जुनं ते सोनं’ म्हणत स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या जुन्या गीतांची आठवण सातत्याने काढली जाते. वारंवार गुणगुणल्या जाणाऱ्या व गाजलेल्या गीतांचा आस्वाद पुन्हा एकदा रसिकांना घेता यावा म्हणून “लता फाॅरेवर” या कार्यक्रमातील गायकांनी मोठ्या उत्साहाणे आपली कला जळगावकरासमोर सादर केली.

यावेळी अविनाश रायसोनी, शेखर रायसोनी, भारती रायसोनी, प्रभा रायसोनी, जोत्स्ना रायसोनी, राजुल रायसोनी, मेहेन्द्र रायसोनी, डॉ. नीरज अग्रवाल, डॉ. एकता अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे ॲकडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सोनल तिवारी उपस्थित होते. प्रा. राहुल त्रिवेदी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची धुरा पेलली तर रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांची ही संकल्पना होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button