बातम्याराष्ट्रीयवाणिज्य

अनेक वर्षानंतर रोहित खेळणार रणजी ट्रॉफी; एका सामन्यासाठी त्याला किती मानधन मिळेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नेहमीच अनेकांच्या मनात असाल प्रश्न पडतो की आंतराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) खेळणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात. भारतीय बीसीसीआयने (BCCI) क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन ठरविले असते. जे कोट्यवधींच्या घरात असते. मात्र रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळणाऱ्या खेळाडूंना एक सामना खेळण्यासाठी किती पैसै मिळतात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत?

सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. या स्पर्धेत भारतीय क्रिकेटचे अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरले आहेत, ज्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) , शुभमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) यांचा समावेश आहे. रोहित शर्मा, जे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत, त्यांनी 3365 दिवसांनंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतला आहे.

खेळाडूंचे मानधन कसे ठरवले जाते?
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील खेळाडूंना त्यांच्या अनुभवानुसार मानधन दिले जाते. ज्या खेळाडूंना 40 पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे, त्यांना दरदिवशी 60 हजार रुपये मिळतात, म्हणजे एका सामन्यासाठी त्यांची एकूण कमाई 3 लाख रुपये असते. 21 ते 40 सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंना दरदिवशी 50 हजार रुपये दिले जातात, ज्यामुळे एक सामना खेळण्यासाठी 2.50 लाख रुपये मिळतात. कमीत कमी 20 सामने खेळण्याचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंना दरदिवशी 40 हजार रुपये मिळतात, म्हणजे एक सामना खेळण्यासाठी 1.60 लाख रुपये मिळतात.

राखीव खेळाडूंना मानधन
ज्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंना देखील मानधन दिले जाते. बीसीसीआयकडून अशा खेळाडूंना 30 हजार, 25 हजार आणि 20 हजार रुपये दिले जातात.

रोहित शर्माची कारकीर्द
रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 128 सामने खेळले आहेत, ज्यात 40 पेक्षा अधिक रणजी सामने आणि 61 प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने समाविष्ट आहेत. त्यामुळे रोहित शर्माला एका रणजी सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळणार आहेत. रोहित शर्माने फॉर्ममध्ये परतण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांनी पहिल्याच सामन्यात अवघ्या 3 धावा करत तंबूत परतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button