---Advertisement---
जळगाव शहर

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे निधन

ramesh shinde passes away
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी (मुद्रीत शोधक) रमेश डोंगर शिंदे यांचे शनिवारी निधन झाले.

ramesh shinde passes away

गेल्या आठवडाभरापासून शिंदे यांना कोरोनामुळे उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. अत्यंत धडाडीचे समजले जाणारे श्री शिंदे हे महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने महासंघाच्या माध्यमातून प्रयत्नशील असायचे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी संघटनेचेही ते सचिव होते. 

---Advertisement---

विद्यापीठात येण्यापूर्वी त्यांनी वृत्तपत्रात मुद्रीत शोधक व उपसंपादक म्हणूनही काही वर्षे काम केले. त्यांच्या निधनाने राज्यातील विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---