⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ‘मामा’ समर्थकांचा बालिशपणा… बातमी केल्याने काढले ग्रुपबाहेर..

‘मामा’ समर्थकांचा बालिशपणा… बातमी केल्याने काढले ग्रुपबाहेर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२१ । शहराचे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे यांच्यावर आजवर अनेकांनी टीका केली, सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यात आले तरीही मामांनी मनाचा मोठेपणा दाखवत सर्व सहन केले. कधीही कुणालाही उलटून उत्तर दिले नाही. दोन दिवसांपूर्वी आ.राजुमामा भोळे समर्थक ग्रुपबाबत जळगाव लाईव्ह न्यूजमध्ये वृत्त प्रकाशित होताच मामा समर्थकांनी बालिशपणा दाखवला आहे. समर्थक म्हणून ग्रुपमध्ये सामाविष्ट असलेल्या बंडखोरांना बाहेर करण्याऐवजी जळगाव लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधीलाच बाहेर काढण्यात आले आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे यांचे नाव नागरिकांकडून नेहमी घेतले जाते. प्रत्येकाच्या सुख, दुःखात धावून जाणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. जळगावकरांनी त्यांना दुसऱ्यांना संधी दिली. आमदार भोळेंच्या दोन्ही टर्ममध्ये त्यांच्यावर विरोधकांनी नेहमी टीका केली. बऱ्याच वेळा खड्डे, रस्ते, धूळ, महामार्ग आणि शहर विकासाच्या मुद्द्यावरून आमदारांना टार्गेट करण्यात आले. आमदार राजुमामा भोळे यांनी आजवर अनेकवेळा टीका सहन केली, कुणालाही काहीही बोलले नाही. आमदारांनी शांतपणे संयम दाखवत मनाचा मोठेपणा दाखवला परंतु आमदारांचे समर्थक मात्र सध्या बालिशपणा करत आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजने दोन दिवसांपूर्वी आमदार राजुमामा भोळे समर्थक व्हाट्सएप ग्रुपबाबत वृत्त प्रकाशित केले होते. आमदार भोळेंविरुद्ध बोलणारे बंडखोर आजही समर्थक असून त्यांना ग्रुपबाहेर करण्यात आले नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले होते. अँडमीन दखल घेत नसल्याचा मुद्दा त्यात मांडण्यात आला होता. बंडखोरांनी नैतिकता दाखवत ग्रुप सोडलाच नाही. शुक्रवारी दुपारी शुभम नामक अँडमीनने जास्तच मनावर घेतले आणि आपला बलिशपणा दाखवून दिला. त्याने बंडखोरांना बाहेर न करता वृत्त प्रकाशित करणाऱ्या प्रतिनिधीला बाहेर केले.

जळगाव शहराच्या आमदारांना कदाचित याबाबत माहिती नसेल परंतु आमदारांच्या जवळील समर्थकांनी हे कृत्य केल्याने आमदारांच्याच नावाला धक्का पोहचला आहे. आमदार राजुमामा भोळे समर्थक ग्रुपचे पुढे काय झाले याबाबत नेमकी माहिती नाही परंतु त्यातून बंडखोरांना आणि एका माजी आमदार तथा मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या एका सदस्याला देखील बाहेर काढल्याची माहिती ग्रुपमधील एका सदस्याने दिली आहे. बघूया पुढे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे काय भूमिका घेतात…!

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.