---Advertisement---
निधन वार्ता

सिनेसृष्टी पुन्हा हादरली ; सर्वांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava ) यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून बॉलिवूड आणि टीव्ही कॉरिडॉरमध्ये शोककळा पसरली आहे. Raju Srivastava passed away

Raju Srivastava passed away jpg webp

10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव वर्कआउट दरम्यान बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले. एम्समध्ये दाखल केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आणि त्यांना सतत लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या हात-पायांमध्ये हालचाल दिसून आली होती, मात्र आज अखेर राजू श्रीवास्तवयांची प्राण ज्योत मालवली.

---Advertisement---

राजू श्रीवास्तवला कॉमेडी शोमधून ओळख मिळाली
राजू श्रीवास्तव हे शोबिज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले. राजू रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाला होता. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमधून राजूला ओळख मिळाली. या शोच्या यशानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव एक अभिनेता, विनोदी अभिनेता तसेच एक नेता होता. ते भाजपशी संबंधित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---