⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

राज ठाकरे एजंट : गुलाबराव पाटलांची जहरी टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । तीन वर्षात तीन भूमिका बदलविणाऱ्या राज ठाकरेंना आता एजंट म्हणून काम करावे लागतेय. ते एजंटगिरी करताय. जसे हवालाकांड असते तसे ते भाजपचा हवाला घेऊन काम करताय. त्यांना कुठेच सहारा मिळत नसल्याने ते भोंग्याचा सहारा घेऊन काम करताय त्यांनी यापुढे कायम भोंग्याचा सहारा घ्यावा अशी ज्वलंत टीका पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका लावून धरली आहे. राज्य सरकारला देखील त्यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे अक्षय तृतीये पूर्वसंध्येला औरंगाबाद येथे सभा घेणार असून त्याठिकाणी आपली अंतिम भूमिका मांडणार आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला होता. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आज राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जळगावात बोलताना ना.गुलाबराव म्हणाले, संभाजीनगर हे बाळासाहेबांचे आहे. संभाजीनगर बाळासाहेबांचे होते आणि आहे. कितीही ऐरेगैरे, नत्थूखैरे गेले तरी शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा संभाजीनगरातून खाली येणार नाही हे येणाऱ्या काळात दिसणार आहे. बाळासाहेब गेलेले नाही. बाळासाहेबांचे डबींग करणारे इथे आहे. बाळासाहेबांचे विचार मनात आहे. त्यांनी कितीही वल्गना करू द्या पण भगवा झेंडा संभाजीनगरात फडकणार, असे पाटील म्हणाले.

पहा काय म्हणाले ना.गुलाबराब पाटील :