⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण ; वाचा हा अंदाज..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक भागात आगामी चार पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून परंतु, गुजरात, राजस्थानातील उष्ण वारे व अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आता एकाचवेळी जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आज ११ ते १४ मे दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला आहे. शुक्रवारी शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, दिवसभरात उन्ह-सावलीचा खेळ सुरू होता. पुढील सहा दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अवकाळीचा जोर वाढणार :
राज्यात आज शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. खान्देशमध्येही वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवारी चंद्रपूर जिल्ह्याला गारपीटीसाठी आणि पुणे, लातूर, नांदेड तसेच सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. सोमवारी, १३ मे रोजी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.