---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; जळगावात काय आहे स्थिती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२४ । महाराष्ट्रातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रविवारी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

rain21july jpg webp

राज्यात २३ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यापूर्वी काल २० रोजी जळगावला येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याचं दिसून आले.

---Advertisement---

आज या जिल्ह्यांना अलर्ट
रविवारी ठाणे , पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, धाराशीव, बीड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोदींया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भात सर्वत्र पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाची संततधार सुरुच आहे. गडचिरोली जिल्ह्यात रविवारी सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रात्री साडेदहा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---