⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात..

येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे . राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज गुरुवारी राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा चंदपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर भंडारा, ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

जळगावात स्थिती काय?
मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अधूनमधून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान,जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्याच्या मध्यम पावसाने शेती पिकांना फायदा होणार आहे. मात्र जिल्हयातील अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला नसल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.