जळगाव जिल्हा

पुढच्या दोन दिवसात राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधारचा इशारा; खान्देशात पावसाची अशी राहणार स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत म्हणजेच येत्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यादरम्यान खान्देशातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यालाही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगावला कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी हलक्या सरीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याने गणपती बाप्पाचं आगमन होताच राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

हवामान खात्याने उद्या २१ सप्टेंबरपासून मुंबई पुण्यासह कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला होता.

आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज बुधवारी नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर आज मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button