⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | सावधान! आज जळगावसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

सावधान! आज जळगावसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होताना दिसत आहे. दरम्यान, आज सोमवारी देखील जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषण वातावरण तयार झालं आहे. येत्या ५ दिवसांत कोकण, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याला अलर्ट जारी
जळगाव जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून हलक्या ते मध्यम पाऊस कोसळत आहे. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही जळगावकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसात आहे. आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगांव जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमान आकडेवारी (MM) दि 8/7/2024
अमळनेर-3
बोदवड-18
भडगाव-
भुसावळ-12.4
जामनेर-16
चोपडा-10
रावेर-12
मुक्ताईनगर-12
धरणगाव-4
यावल-55.3
एरंडोल-4

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.