⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | हवामान | Rain Alert : खान्देशात आजपासून 3 दिवस पावसाची शक्यता

Rain Alert : खान्देशात आजपासून 3 दिवस पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । यंदा सहा दिवस आधी मान्सूनने देश व्यापले आहे. दरवर्षी 8 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. यावर्षी मात्र 2 जुलैलाच सर्वत्र तो सक्रीय झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 6 जुलैपासून राज्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. खान्देशात आजपासून पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. Rain Update News Maharashtra Today

पावसाळा सुरु होण्यास एक महिना उलटला आहे. या महिन्याभरात राज्यातील काही भागातच मान्सूनची कृपादृष्टी राहिलेली आहे. मात्र, अद्यापही अनेक भागात मान्सूननं दमदार हजेरी लावली नाहीय. मात्र त्यांनतर पावसाने दडी मारली होती. दरम्यान, अशातच आजपासून म्हणजेच 3 ते 6 जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होणार आहे. पण जुलै महिन्यात यामध्ये बदल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळेच पुढील तीन दिवस कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर खान्देशात आजपासून पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. शनिवारी जळगाव शहरात दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. दीड तासात तब्बल १५ मिलिमीटर पाऊस झाला. तर शहरातील मध्यवर्ती भागात तर काही उपनगरांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी काेसळल्या. दुपारी १ वाजेनंतर मात्र शहरासह तालुक्यातदेखील पावसाचा जाेर वाढलेला हाेता.

खरिपाच्या भवितव्यासाठी पाऊस गरजेचा
नाही म्हणलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी अल्पशा पावसाच्या जोरावर खरिपातील पेरण्या उरकल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या शिवाय अधिकचा वेळ झाला उत्पादनावर परिणाम होईल यामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली. आता खान्देशातही पेरण्या उरकल्या गेल्या आहेत. जुलै महिन्यात पिकांची वाढ जोमात होत असते. आता पावसाने हजेरी लावली तरच पिके तरली जाणार आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.