जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जून महिन्यात ओढ दिल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. सध्या राज्यात पावसाने उसंती घेतली असली तरी हवामान खात्याकडून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४,५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या काळात नागिरकांनी काळजी घेत, शक्य असल्यास घराबाहेर न पाडवं अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. Rain Update News In Maharashtra Today
जुलैच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राला पावसाने झोडपलं. १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. सर्वदूर झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीही ओढावली.अशात गेल्या आठवड्याभरात पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, भारतीय हवामान खात्याकडून पुढच्या चार ते पाच दिवसात राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस होईल आणि मध्यम पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही अनेक नद्यांना पूर आला. यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास घरातच रहा राहावे अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.