---Advertisement---
हवामान

जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढचे दाेन दिवस मुसळधार, अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । गेल्या जुलै महिन्यात राज्यासह जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली. राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु अशातच आता हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून (Department of Meteorology) राज्यातील जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना पुढचे दोन तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Rain Alert In Jalgaon District Today

rain jpg webp

दरम्यान, राज्यासह जळगाव जिल्ह्यात काही दिवसापासुन पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाडा देखील वाढलेला होता. पण हा उकाडा आता जास्त वेळ टिकणार नाही. कारण जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महारा‌ष्ट्रात आजपासून पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी जोरात वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

---Advertisement---

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आजपासून 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता. बुधवारी देखील जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र बुधवारी जिल्ह्यात पावसाने दडी मारली हाेती. पुढील दाेन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यास खरिपाच्या पिकांना त्याचा फायदा हाेणार आहे. दरम्यान, जळगाव शहरासह तालुक्यासाठी नवसंजीवनी असलेली वाघूर नदी यंदा अजूनपर्यंत खळाळून वाहिलेली नाही. त्यामुळे अजिंठा डाेंगररांगात जाेरदार पाऊस हाेण्याची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---