जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून आता हवामान खात्याकडून राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच जळगावसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक नदी-नाले पुन्हा तुंडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान झालेल्या पावासाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येईल अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता राज्यातील काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली.तसेच पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने गडचिरोलीला झोडपून काढलंय.
जळगावला पुन्हा अलर्ट
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. गेला दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. सोमवार आणि मंगळवारी अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार आज जिल्हयात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.
जळगांव जिल्हा
दि16/ 8/2022
अमळनेर-
बोदवड-21
भडगाव-
भुसावळ-12.8
पाचोरा-
पारोळा-12
जामनेर-22
चोपडा-8
चाळीसगाव-1
रावेर-10
मुक्ताईनगर-11
धरणगाव-8
यावल-18
एरंडोल-10
जळगाव-14