⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | ढगाळ वातावरणामुळे जळगावात गारवा निर्माण; आज पावसाबाबत काय आहे अंदाज?

ढगाळ वातावरणामुळे जळगावात गारवा निर्माण; आज पावसाबाबत काय आहे अंदाज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२३ । सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. राज्यात ४ मार्चपासून अवकाळी‎ पावसाच्या ढगांनी आकाश व्यापले‎ आहे. मागील गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात देखील रात्री अवकाळी पावसाच्या सरी पुन्हा बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जळगावात जिल्ह्यात‎ तुरळक ठिकाणी रात्री अवकाळी‎ पावसाच्या सरी काेसळल्या. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासूनच गारवा वाढला आहे. परंतु‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ढगाळ वातावरणाचा परिणाम‎ आराेग्यावर झाला आहे. उन्हाची‎ तीव्रता काही प्रमाणात घटली.‎ जळगावात किमान तापमान ३७.६ अंशांवरून‎ ३३ अंश सेल्सिअंशांवर आले आहे.‎

8 मार्चपर्यंत राज्यावर अवकाळीचे ढग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. 8 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अवकाळीचे ढग दूर होतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

आज या भागात पावसाचा इशारा
दरम्यान, आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. विजा आणि मेघगर्जनांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशारा आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. अवकाळीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता या नुकसानी बाबतचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.