---Advertisement---
बातम्या

हुsssssश! ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळणार ; उत्तर महाराष्ट्रासह या भागात पावसाचा अंदाज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२३ । राज्यातून पावसाने माघारी घेतल्यानंतर तापमानात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक ‘ऑक्टोबर हिट’मुळे त्रस्त झाला असून यातून कधी दिलासा मिळेल याची प्रतीक्षा करत आहे. मात्र,अशात हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

rain jpg webp webp

हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यात आज म्हणजेच १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी कोकणातील काही ठिकाणी ढगाळ आकाश आणि काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे,असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

---Advertisement---

राज्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागत आहेत. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पर्यंत जात असून दुपारनंतर असह्य करणारा उकाडा जाणवत आहे.

राज्यातील काही भागात कमाल तापमान सामान्य तापामानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात येत आहे. मुंबई,पुण्यासहित मराठवाड्यातही नागरिकांना ऑक्टोबर हिट जाणवत आहे. मात्र, हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे नागरिकांना ‘ऑक्टोबर हिट’पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---