---Advertisement---
हवामान

उष्णतेने घामाघूम झालेल्या जळगावकरांना मिळेल दिलासा ; ‘या’ तारखेला पावसाची शक्यता..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२३ । मार्च नंतर एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे उष्णतेतून जळगावकरांना दिलासा मिळाला. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगावकरांना मे हिटचा चांगलाच तडाखा बसला. या आठवड्याच्या पंधरवडामध्ये देशातील सार्वधिक तापमानाची नोंद जळगावात झाली होती. यामुळे उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाला असून पावसाची प्रतीक्षा करत आहे. अशातच जळगावात जिल्ह्यात 7‎ ते 10 जून दरम्यान तुरळक स्वरुपाचा पाऊस काेसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

rain jpg webp webp

सध्या उन्ह-सावल्यांचा खेळ सुरू‎ झाल्याने काल रविवारी पारा किंचित‎ घसरून 41.3 अंशांवर आला होता.‎ यामुळे नागरीकांना काही‎ प्रमाणात दिलासा मिळाला. काही‎ तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरणासह‎ थंड हवा होती. पाऊस पडेल असे‎ चित्र हाेते पण तसे झाले नाही.‎ दुपारी उन्ह-सावल्यांचा खेळ सुरू असल्याने तापमानात घसरण झाली आहे.‎

---Advertisement---

दरम्यान, जळगावमध्ये 7‎ ते 10 जून दरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज राज्यातील काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे

काही भागांत अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---