---Advertisement---
जळगाव जिल्हा

उष्णतेतून मिळणार दिलासा? जळगावात आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२५ । मागच्या काही दिवसापासून तापमानात ४३ अंशावर स्थिर असून यामुळे वाढत्या उष्णतेमुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यातच काल शनिवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण दिसून आली. शनिवारी जळगावचे तापमान ४१.१ अंशावर होते. दुपारनंतर उन्हाचा चटका जाणवला. दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाब, दक्षिणेकडील आर्द्र हवा आणि ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे

Rain

भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात आगामी तीन ते चार दिवसांसाठीचा अंदाज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या कालावधीत मिश्र प्रकारचे तीव्र हवामान राहण्याची शक्यता आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

---Advertisement---

जळगावमध्ये आज रविवारी आणि उद्या सोमवारी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज पावसाचा अंदाज ५० टक्के, तर सोमवारी तो ६० ते ७० टक्के इतका आहे. हा पाऊस झाल्यास उष्णतेची तीव्रता अजून काहीशी कमी होऊ शकते. दरम्यान, शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले. मात्र पावसाने हजेरी लावली नाही.

उष्णतेपासून मिळणार अल्प दिलासा
जळगाव जिल्ह्यात वायू वेगातील अस्थिरता आणि आर्द्रतेचा संयोग घडून येत आहे, जो पावसासाठी पूरक ठरतो. या स्थितीमध्ये दुपारनंतर ढग जमा होऊन अचानक सरी पडण्याची शक्यता वाढते. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, आकाशात ढगांचा गडगडाट होऊ शकतो. तापमानात घसरणीमुळे जळगावकरांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment