जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । राज्यात पावसाचे पुन्हा जोरदार पुनरागम झाले असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात राज्यात पावसाचे राहणार आहे. आज रविवारी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने गणपती बाप्पाच्या विसर्जन दिवसापासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मागील दोन दिवसापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्याच्या खंडानंतर राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
तर आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, पुणे परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. सप्टेंबरमध्ये जवळपास 109 टक्के हवामानाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
जळगावला यलो अलर्ट जारी
जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले असून शेतकरी सुखावला आहे.
जळगांव जिल्हा दि11/ 9/2022
अमळनेर-13
बोदवड-12
भडगाव-28
भुसावळ-16.6
पाचोरा-
पारोळा-20
जामनेर-3
चोपडा-4
चाळीसगाव-43
रावेर-25
मुक्ताईनगर-21
धरणगाव-17
यावल-0
एरंडोल-19
जळगाव-5.2