जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । राज्यात दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा घाट माथ्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जळगावला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Rain Alert In Jalgaon
राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे मात्र, काही ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या आठवड्यात दक्षिण गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत द्राेणीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा मुक्काम वाढणार आहे. आज हवामान खात्याने पुणे, सातारा घाट माथ्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज साेमवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी हाेऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
कोल्हापूर, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया गडचिरोली, भंडारा,