---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार ; जिल्ह्यात ‘या’ तारखेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान पुढील आणखी काही दिवस अशीच स्थिती कायम असणार आहे, अशी अशक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आज शनिवारी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला नसला तरी पुढील चार दिवस जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

mansoon rain jpg webp

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

---Advertisement---

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. काल शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून धाे-धाे पाऊस बरसला. तब्बल दाेन तासांपर्यंत पावसाचा जाेर कायम हाेता. सायंकाळी सात वाजेनंतरही रिपरिप सुरूच हाेती. संततधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट नाहीय, मात्र उद्या म्हणजेच रविवारपासून ते बुधवारपर्यंत जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढू शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---