जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दरम्यान, घालमेल होणाऱ्या जिल्हावासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देखील ढगाळ वातावरण असल्याने आर्द्रता, तर मध्येच ऊन पडल्याने तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे.
शनिवारी देखील ३६ अंश तापमान होते. कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती ७ सप्टेंबरपर्यंत कायम राहील. यानंतर मात्र ८ तारखेपासून पाऊस वाढेल. पुढील चार दिवस तो जोरदार बॅटिंग करेल.