⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | नागरिकांनो काळजी घ्या! IMD कडून जळगाव जिल्ह्याला जोरदार पावसाचा अंदाज..

नागरिकांनो काळजी घ्या! IMD कडून जळगाव जिल्ह्याला जोरदार पावसाचा अंदाज..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२४ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. मात्र मागील तीन चार दिवसापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंती घेतली.

पंरतु आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. परिणामी राज्यातील वातावरणात बदल झाला असून आज म्हणजेच शनिवारपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय. विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.

जळगावात पावसाचा जोर पुन्हा वाढणार?
दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. मात्र मागील गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात ब्रेक घेतलेल्या पावसाचे पुन्हा पुनरागमन होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. उद्या म्हणजेच दि. १ ते ५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आ

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.