⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | हवामान खात्याचा राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा हायअलर्ट; आज जळगाव कसं असेल हवामान?

हवामान खात्याचा राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा हायअलर्ट; आज जळगाव कसं असेल हवामान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । राज्यात पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील विविध भागात परतीचा पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु असताना विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे पावसाने दांडिया आणि गरब्याचा देखील खेळ बिघडवला. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2,3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता. परिणामी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जने, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान आज शुक्रवारी जळगावसह राज्यातील २५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबई, नवी मुंबईसह पालघर, ठाण्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकले असून गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय झाले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.