जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । भारतीय रेल्वेने देशातील करोडो लोक प्रवास करतात त्यामुळे रेल्वे आपल्या प्रवाशांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचा दावा करते, मात्र अनेक वेळा प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे रेल्वेची व्यवस्था बिघडते, प्रवाशांच्या तुलनेत गाड्या, डबे आणि बर्थची कमी संख्या समस्या निर्माण करते, मात्र रेल्वेने आता नवा नियम केला आहे, यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ती म्हणजे जर प्रवासी रेल्वे गाडी सुटल्यानांतर १० मिनिटात सीटवर पोहोचला नाही, तर ती सीट आरएसी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रवाशाला उपलब्ध करून दिली जाईल.
खरे तर अनेक वेळा आपल्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत प्रवास करताना प्रवासी त्यांच्या आरक्षित बर्थऐवजी दुसऱ्या ठिकाणी बसून ट्रेनमध्ये प्रवास करतात आणि प्रवासी आरक्षण न करता त्यांच्या आरक्षित बर्थवर बसून प्रवास करतात, मात्र आता असे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांची बर्थ दिसण्याची वेळ निश्चित केली आहे.
ट्रेन सुटल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत प्रवासी सीटवर पोहोचला नाही तर तो आता विनातिकीट असेल. त्याची जागा दुसऱ्या प्रवाशाला दिली जाईल. आता टीटीई कर्मचारी एक-दोन स्थानकांपर्यंत प्रवाशांची वाट पाहणार नाहीत. रेल्वे बोर्डाने प्रवाशांना त्यांच्या जागेवर पोहोचण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी निश्चित करणारा आदेश जारी केला आहे.
यापूर्वी काय होते?
एका टीटीईने सांगितले की, मशीन येण्यापूर्वी मॅन्युअल चार्ट तयार करण्यात येत असे. यात १५ मिनिटे किंवा स्टेशन सोडेपर्यंत वाट पाहिली जात होती. आता केवळ १० मिनिटे देण्यात येत आहेत. मात्र, गर्दी असल्यास टीटीई कर्मचाऱ्यांना प्रवाशापर्यंत पोहोचण्यास अधिक वेळ लागू शकतो.