वाणिज्य

प्रवासांसाठी कामाची बातमी ! रेल्वेने सुरु केली ही नवीन सुविधा, असा मिळेल तुम्हाला फायदा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने तिकीट काढण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. नवीन सुविधेअंतर्गत, तुम्ही ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन (ATVM) वरून उपलब्ध असलेल्या सुविधांसाठी डिजिटल व्यवहारांद्वारे पेमेंट देखील करू शकता.

डिजिटल मोडमध्ये जास्तीत जास्त पैसे भरण्याचे आवाहन
या अंतर्गत, तुम्ही ATVM वरून तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास मिळविण्यासाठी डिजिटल मोडमध्ये पैसे देऊ शकता. अनेक रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम आणि यूपीआय आणि क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही ATVM स्मार्ट कार्ड रिचार्ज देखील करू शकता. रेल्वेच्या वतीने ही सुविधा सुरू केल्याच्या निमित्ताने प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने जास्तीत जास्त पैसे भरून लांबलचक रांगांपासून सुटका करण्याचे आवाहन केले.

लांब लाईनपासून सुटका होईल
ज्या स्थानकांमध्ये जास्त प्रवाशांची गर्दी असते, अशा स्थानकांवर एटीव्हीएमची सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात येत आहे. अशा स्थानकांवर प्रवाशांकडून तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याच्या तक्रारी अनेकदा रेल्वे बोर्डाकडे येतात. लांबच लांब रांगांमुळे प्रवासी ट्रेन चुकल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

ते कसे कार्य करेल
या सुविधेअंतर्गत, तुम्हाला पेटीएम, फोनपे, फ्रीचार्ज आणि यूपीआय आधारित मोबाइल अॅप्सवरून क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरावे लागतील. तुम्हाला मशीनवर QR कोड फ्लॅश होताना दिसेल, त्यानंतर तुम्हाला तो स्कॅन करावा लागेल. ते स्कॅन केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानाचे तिकीट मिळेल. रेल्वेने डिजिटल पेमेंटच्या सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी क्यूआर कोडवरून तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button