जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । भारतीय रेल्वेनं दररोज करोडो प्रवाशी प्रवास करतात जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला धक्का देणारी एक बातमी आहे. भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर २६ डिसेंबरपासून लागू होणार असून यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दरम्यान सामान्य क्लासमधून २१५ किलोमीटरपेक्षा कमी अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नाही.२१५ किलोमीपेक्षा जास्त लांब प्रवास करणाऱ्या तिकीट दरात प्रति किलोमीटर १ पैशांनी वाढ केली आहे. मेल एक्स्प्रेम, नॉन एसी आणि एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढ केली आहे.

जर ५०० किलोमीटरचा प्रवास तुम्ही नॉन एसी ट्रेनने करत असाल तर त्यापेक्षा १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. रेल्वेद्वारे निश्चित केलेल्या तिकीट दरानुसार आता दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास महागणार आहे. दिल्ली ते मुंबई हे अंतर १३८६ किलोमीटर आहे. सध्या सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसचे ३ एसीचे तिकीट ३१८२ रुपये आहे. यामध्ये २ रुपये प्रति किलोमीटर हिशोबाने २७ रुपये जास्त द्यावे लागणार आहे. ट्रेनचे तिकीच ३२०७ रुपये होईल.

या वर्षभरात दोनदा झाली तिकीट दरात वाढ
भारतीय रेल्वेने या वर्षभरात दोनदा तिकीट दरात वाढ केली आहे. जुलै महिन्यात याआधी तिकीट दर वाढवले होते. त्यानंतर आता वर्ष संपताना तिकीट दरात वाढ केली आहे. मेल एक्सप्रेस, एसी, नॉन एसी रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केली आहे.









