---Advertisement---
नोकरी संधी

रेल्वेत नोकरी मिळविण्याची मोठी संधी..! या पदांसाठी भरती बंपर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक मोठी संधी चालून आलीय. भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट या पदांसाठी मोठी भरती आयोजित केलीआहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. Railway Bharti 2023

railway job jpg webp webp

या भरतीअंतर्गत एकूण २३८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल २’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Railway Recruitment 2023

---Advertisement---

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
किंवा – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केलेला असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील ४५ आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

किती पगार मिळेल?
असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करायला सुरुवात तारीख – ७ एप्रिल २०२३
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०२३

उमेदवारांची निवड –
संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील. भारतीय रेल्वे भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---