जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । भारतीय रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करत असतात. अनेक जण आरक्षण करुन रेल्वे प्रवास करण्यास प्राधान्य देतात. काही जणांना आरक्षण न मिळाल्याने जनरल तिकीटावर प्रवास करावा लागतो. परंतु काही प्रवाशी चक्क तिकीट न काढता रेल्वेतून प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर रेल्वेकडून बडगा उगारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ वाणिज्य विभागाने एप्रिल २०२४ मध्ये १३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या प्रयत्नाने हे उद्दिष्ट पूर्ण झाले. भुसावळ वाणिज्य विभागाला एप्रिल २०२४ मध्ये ७१.९५ कोटी रुपयांचा प्रवासी महसूल प्राप्त झाला आहे. यात ९.२५ कोटी रुपये महसूल तिकीट तपासणीतून प्राप्त झाला आहे. विविध कोचिंगमधून ५.९९ कोटी रुपये मालवाहतुकीतून ५४.६० कोटींचा महसूल मिळाला आहे. पार्सल सेवेतून २.६९ कोटी, तर इतर व्यवसायातून १.७८ कोटी रुपये प्राप्त झाले.